परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘नॅक’चे नामांकन

आर्वी: येथील श्री साई परणकर संस्थेद्वारा संचालित आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालयाला नुकतेच उत्कृष्ट श्रेणीसह ‘अक्रीडीटेशन’ (Accreditation) मिळाले आहे. त्यांना हा दर्जा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) बंगळूरुच्या चमूने दिलेल्या भेटीनंतर मिळाला आहे.

ही संस्था राष्ट्रीय स्तरावर महाविद्यालय व विद्यापीठांनी केलेल्या कार्यांच्या आधारावर त्यांचे मूल्यांकन करून निकषांच्या आधारावर नॅक अक्रीडीटेशन हा दर्जा प्रदान करते. परांणकर अभियांत्रिकी महाविद्यालयाला हा दर्जा अवघ्या सात वर्षांत उत्कृष्ट व्यवस्थापन, कार्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्राप्त केले आहे. यासोबतच संस्था आपल्या स्तरावर सामाजिक कार्यातसुद्धा अग्रेसर असून अनेक पुरस्कार मिळाले आहे. कोरोना महामारीत १०० टक्के प्लेसमेंटकरीता ‘प्राइड ऑफ नेशन’ हा पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला होता. तसेच ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड-२०२४’ हा कॅन्शन्सनातर्फे नवी दिल्ली येथे मिळाला. याशिवाय लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आदी पुरस्कार मिळाले आहेत. विद्युत अभियांत्रिकी शाखेचा उन्हाळी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, संस्थेमधून पदवीप्राप्त विद्यार्थी आज मोठमोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत.

संस्थेचे अध्यक्ष घनश्याम परणकर, सचिव प्रीतीताई परणकर यांनी संचालक डॉ. रवींद्र परणकर, प्राचार्य डॉ. एन. निवास राव, आयक्यूएसी समन्वयक प्रा. प्रवीण सपाने, नॅक समन्वयक प्रा. निखिल एकोतखाणे, प्रशासन अधिकारी प्रा. योगेश पालिवाल यांचे विशेष कौतुक केले. यासाठी प्रा. महेंद्र गुरुसिंगानी, प्रा. संकेत ठाकरे, प्रा. जिशान शेख, प्रा. प्रणव पांडे, प्रा. मोहित चांदक, प्रा. जयेश गांधी, प्रा. आचल आमले, प्रा. मनिषा बनगरे, प्रा. ऋतुजा खोडके, प्रा. अंकिता दिवे, प्रा. स्वाती रखारे, प्रा. निशा बावणे, प्रदीप चौधरी, निलेश ठाकरे, मंगेश बडनारे, साहिल वानखेडे, राजेश वानखेडे तसेच प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यानीसुद्धा उत्कृष्ट केल्याने महाविद्यालयाला हे यश प्राप्त झाल्याने संस्थाध्यक्ष घनश्याम परांणकर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *