आर्वी येथील आर.व्ही. परणकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि लोकोपयोगी दोन प्रकल्प तयार केले आहेत. यामध्ये ‘२०४० पर्यंत आर्वीसाठी पाणी पुरवठा नियोजन आराखडा’ आणि ‘सोलर ऑपरेटेड हँड से मशीन’ यांचा समावेश आहे.

‘२०४० पर्यंत शहरी-ग्रामीण पाणी पुरवठा नियोजन आराखडा’ या प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आर्वी परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील पाण्याची गरज कशी भागवता येईल याचा अभ्यास केला.

‘सोलर ऑपरेटेड हँड से मशीन’ हे यंत्र सौर ऊर्जेवर चालते, ज्यामुळे शेतीतील कामे अधिक सोपी आणि कमी श्रमात करता येतात. हे यंत्र गवत कापण्यासाठी किंवा इतर हलक्या कामांसाठी उपयोगी आहे. विद्यार्थ्यांना डॉ. रवींद्र परणकर, प्रा.राहुल घाटोळे, प्रा. प्राची मालवीय, प्रा.नितीन नवघरे आदी प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.

या प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *