आर्वी येथील आर.व्ही. परणकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये महाराष्ट्र दिन आणि मजदूर (कामगार) दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ८ वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात संचालक डॉ. रवींद्र परणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. परणकर यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व समजावून सांगितले.

प्रा. महेंद्र गुरूनासिंगानी, प्रा. एकोतखाणे, प्रा. पालीवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. संकेत ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. प्रवीण सापाने, प्रदीप चौधरी, मंगेश वडणारे, नीलेश ठाकरे, राजेश वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *